मंत्री माणिकराव कोकाटे यांना अपात्र करा, निवडणूकीसाठी लाडक्या बहिणी त्यांचा एक हप्ता द्यायला तयार - जयश्री शेळके
शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की त्यांना अपात्र घोषित केले तर निवडणुका पुन्हा घ्यावे लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाही हे या राज्याचे दुर्दैव आहे.
न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून या राज्य शासनाला निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहिणीचा योजनेचा एक हप्ता राज्य शासनाला द्यायला तयार आहे.
पण निवडणूक पुन्हा होऊ द्या त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली