LOKSANDESH NEWS
मोहफुल संकलनातून मिळतोय ग्रामस्थांना हंगामी रोजगार
मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात. या मोहफुलांमुळे गावकऱ्यांना बेरोजगारीच्या काळात रोजगार मिळतो. औषधांच्या निर्मितीतही मोहफुलाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. उन्हाळ्यात शेतमजुरांना रोजगार नसतो अशात मोहफुले संकलनातून त्यांना रोजगार मिळतो
. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला रानमेवा म्हणतात तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही. या दिवसांत वनांचलच्या गावांमध्ये 'पिवळे सोने' नावाची मोहाची फुले पडू लागली आहेत
. ती फुले गोळा करण्यासाठी ग्रामस्थ सकाळपासूनच शेतात व जंगलात जात आहेत. मोहफुलाचा मादक सुगंध जंगलात सर्वत्र पसरत आहे
,
त्यामुळे ये-जा करणारेही आकर्षित होत आहेत. दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन होत असून त्यांचे संकलन गावकरी करतात.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली