LOKSANDESH NEWS
पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्त्यांची काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत - अनिता परदेशी
डोंबिवली मध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यात गटारबांधणीची कामे चालू असताना आता सेवा वाहिन्यांच्या कामांची देखील भर पडणार आहे. काँक्रीटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याचे लक्ष केडीएमसीने ठेवले असले तरी पावसाळयापूर्वी कामे पूर्ण होतील का?
डोंबिवली मध्ये गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. आगामी पावसाळा पाहता सध्या कामांना वेग आला असून, ही कामे एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून सुरू आहेत.
या कामाची पाहणी केडीएमसी करत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होतील असा दावा केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली