LOKSANDESH NEWS
मनपा आयुक्ताच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण स्थगित, दोन-तीन दिवसात अतिक्रमण काढण्यास सुरुवात करणार असल्याचे आयुक्त यांची माहिती
- मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दुपारी 12 वाजता उपोषणस्थळी भेट दिली. खांडेकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कुंडलिका-सिना नदीवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक, पालिकेचे पथक तसेच पोलिसांची मदत घेऊन सदरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करणार असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिनांक 16 रविवार रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले.
कुंडलिका, सीना नदीतील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी 15 मार्च रोजी रामतीर्थ स्मशानभूमी समोर उपोषण सुरू केले होते. येत्या 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जालन्यातील मामा चौकात साखळी उपोषण करणार असा इशारा महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी दिलाय. जालन्यातील कुंडलिका आणि सीना या दोन नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. याचे लेखी निवेदन देऊनही कारवाई होत नाहीये. विशेष म्हणजे गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर अतिक्रमण हटावचा बुलडोजर चालवणाऱ्या महापालिकेने या प्रश्नाकडे मुद्दामहून डोळेझाक केल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केलाय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली