|
LOKSANDESH NEWS
यावर्षी गावरान आंब्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गावरान आंब्याला चांगलाच बहर लागला आहे, कैऱ्याही लागल्या आहेत. परिसरात या बहराचा चांगलाच सुगंध दरवळतोय. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
मात्र, येत्या काळात वातावरणात बदल किंवा वादळी वाऱ्यासह पाऊस न झाल्यास हा बहर, कैऱ्या कायम राहिल्यास यापासून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न होईल, इतर विविध जातीच्या आंब्याच्या तुलनेत आजही गावरान आंब्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी गावरान आंब्याचे उत्पन्न घेत असतात.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली