नागपूर येथील हिंसाचारानंतर अमरावती शहर अलर्ट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नागपूर येथील हिंसाचारानंतर अमरावती शहर अलर्ट

LOKSANDESH NEWS 




 नागपूर येथील हिंसाचारानंतर अमरावती शहर अलर्ट



 औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. तर दुसरीकडे अमरावती शहरात देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतला. 

तर शहरात ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर मध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेच आवाहन करत कुणीही अफ़वा पसरवू नये तर अमरावती शहरात शांतता आहे. कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं.




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली