LOKSANDESH NEWS
आदिवासींमध्ये होळीचा उत्साह, आदिवासी वेशभूशेत नृत्य
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील आदिवासी हे कामाच्या शोधात मेळघाट, धारणी आणि चिखलदरा गावातून वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी जातात आणि आदिवासी बांधवाच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो.
होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र जमतात. मेळघाटात होळी पाच दिवस साजरा केली जाते. आज होळीच्या दिवशी सकाळपासूनच आदिवासी बांधव आपल्या वेशभूषेत नृत्य करताना दिसले.
आपल्या आदिवासी वेशभूषेत बासरीच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करत आहेत. सायंकाळी होलिका दहन मेळघाटात होते.
आदिवासी बांधवांमध्ये या होळी दरम्यान फगवा देखील मागितला जातो.