LOKSANDESH NEWS
होळी उत्सवानिमित्त शिर्डीत साई समाधी मंदीराला फुलांची सजावट
आज होळी उत्सवानिमित्त शिर्डीत साई समाधी मंदीराला आकर्षक फुलांची सजावट करत विविध कार्यक्रमांचे आयोजन दिवसभर करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था
, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही होळी स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून,
दानशूर साईभक्त श्री अखिल गुप्ता, यु.के. यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.