बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

LOKSANDESH  NEWS 




                  बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी 



 तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे आधीच सर्वत्र खळबळ उडालेली असताना आता बार्शी शहर पोलिसांनी बार्शी-परांडा रोडवरील स्वराज हॉटेलच्या बाजूस शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून त्यात अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.यात कारसह १३ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत बार्शी शहर पोलिसांनी आरोपीकडून जागेवरच १० लाखांच्या कारसह २ लाखांचे २० ग्रॅम मेफेड्रॉन अमली पदार्थ (एम.डी.),एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, रोख ८ हजार आणि तीन मोबाइल असा १३ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख यांच्यावर एन.डी.पी.एस. कलम ८ क, २२ ब, २९ व भारतीय शस्त्र अधि. १९५९ नुसार व महाराष्ट्र पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अटक केलेल्या आरोपींना तपासी अधिकारी पो.स.ई. अभय माकणे यांनी बार्शी न्यायालयाचे न्या. एच.यू. पाटील यांच्या समोर उभे करताच आरोपींना ५ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.या दरम्यान चौकशी करुन या प्रकरणाचा राज्यातील इतर प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपासणी केली जाणार आहे.

 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली