विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या सकाळी कट्टा बैठका

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या सकाळी कट्टा बैठका

                                                         LOKSANDESH NEWS 




                


                         विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या सकाळी कट्टा बैठका



 राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सकाळी कट्टा बैठका घेतल्या. सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी भेट देत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरातील नागरिकांशी पाणी प्रश्नांवर संवाद साधला.

 शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू केलेले "लबाडांनो पाणी द्या" या जन आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करत शहराच्या पाणी पुरवठ्याची विस्कळीत झालेल्या व्यवस्थेची माहिती दिली. १० ते १२ दिवसाला पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. 

तसेच शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण चांगले आंदोलन सुरू केले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली