LOKSANDESH NEWS
मुंबईच्या पोलीस ठाण्यांना देखील आता आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी निकषांची पूर्तता केली जात आहे.
परिमंडळ सात मधील सर्वच्या सर्व आठ पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपयुक्त कार्यालयाला देखील आयएसओचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निकषांची पूर्तता करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याची डागडुजी करण्यात आली आहे.
यासोबतच पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात हेल्प डेस्कची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच गुन्हे प्रकटीकरण आणि तक्रार निवारण हे अधिक जलद गतीने करण्याचा प्रयत्न या मुळे केला जाणार आहे. आयएसओ दर्जाचं मानांकन मिळाल्यामुळे आता पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली