LOKSANDESH NEWS
सिंधुदुर्गात उद्या भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा होणार
भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेस ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आता सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे.
उद्या, ६ एप्रिल रोजी ४५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. उद्याचा वर्धापन दिन आगळावेगळा साजरा केला जाणार असून, गेल्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता.
त्यामुळे उद्या मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली