सुपर स्पेशालिटी रुग्णालय फेज टू मधील लिफ्ट चार महिन्यापासून बंद, रुग्णांना घेऊन चौथ्या मजल्यावर जातांना नातेवाईकांना मनस्ताप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सुपर स्पेशालिटी रुग्णालय फेज टू मधील लिफ्ट चार महिन्यापासून बंद, रुग्णांना घेऊन चौथ्या मजल्यावर जातांना नातेवाईकांना मनस्ताप

LOKSANDESH  NEWS 



 सुपर स्पेशालिटी रुग्णालय फेज टू मधील लिफ्ट चार महिन्यापासून बंद, रुग्णांना घेऊन चौथ्या मजल्यावर जातांना नातेवाईकांना मनस्ताप 



 महाराष्ट्रा मध्ये नाशिक आणि अमरावती अशा दोन ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय आहे. या दोन रुग्णालया पैकी एक रुग्णालय अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) आहे. या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालया मध्ये वेग वेगळ्या जिल्ह्यातुन उपचार घेण्यासाठी लोक येत असतात.  या रुग्णालयात मोठ्या शास्त्रक्रिया यशस्वी झाल्या या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय येथील फेज टू मधील लिफ्ट मागील चार महिन्यापासून बंद आहे. 


 ही इमारत चार मजली असून येथे चौथ्या मजल्यावर कॅन्सर तर तिसऱ्या मजल्यावर कार्डियाक विभाग आहे. परंतु लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना पायऱ्या, तसेच स्ट्रेचर, व्हील चेअरवर न्यावे लागत आहे. लिफ्ट तत्काळ दुरुस्ती करण्याची ओरड रुग्णांसह नातेवाईकांकडून होत आहे. 

सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे जटिल शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी दैनंदिन रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या ठिकाणी कॅन्सर, हार्ट, प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक, तसेच किडनी च्या विविध आजारांवर उपचार करण्यात येतो. त्यामुळे रुग्णांची संख्या तसेच आपत्कालीन सेवाही या ठिकाणी देण्यात येते. शासनाच्या योजनांचाही रुग्णांना फायदा होतो. मात्र, या रुग्णालयातील लिफ्ट मागील चार महिन्यांपासून बंद पडली आहे. लिफ्ट सुरु करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु लिफ्ट मात्र सुरु झाली नाही. 

त्यामुळे अती गंभीर रुग्णांना व्हील चेअर वर नेण्यात येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना व्हील चेअर ला धक्का द्यावा लागत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एका वृद्ध महिला उपचार घेण्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय गाठले. यावेळी लिफ्ट बंद असल्याने तसेच व्हिलचेअर देखील उपलब्ध न झाल्याने 84 वर्षीय वृद्ध महिला तिच्या मुला सोबत चौथ्या मजल्यावर पायदळ नेण्याची वेळ आली. प्रशासन याची दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली