LOKSANDESH NEWS
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार
छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या वाळूज टोल नाका येथे जालन्याहून श्रीरामपूर कडे निघालेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने चालक आणि वाहक सतर्क असल्यामुळे बचावले असून, या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
गोविंद रामनाथ मैट असे कार चालकाचे नाव असून, या घटनेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली