गोंदिया जिल्हा आदिवासी जिल्हा व नक्षल प्रभावी जिल्हा म्हणून ओळखला जातो. वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी परिवहन विभागाच्या वतीने आता दुर्गम भागांमध्ये शिबिरं घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील विश्रामगृहामध्ये शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांचे दुचाकी चालवण्याचे परवाने, लायसन्स बनविण्यात आले.
तर दर शनिवारी सुट्टीच्या दिवशी प्रत्येक तालुक्याच्या भागांमध्ये अशाच प्रकारचे शिबिर घेण्यात येतात. ज्या नागरिकांनी आतापर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज केला नसेल त्या नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करून एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी याकरिता गोंदिया जिल्ह्यामध्ये आठ तालुका ठिकाणी सेंटर देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास आरटीओ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हा परिवहन अधिकारी यांनी केले.