LOKSANDESH NEWS
रामनवमीच्या उत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नागपूर मध्ये रामनवमीचा मोठा उत्सव आहे. त्याबद्दल आमची तयारी झालेली आहे. शोभायात्रा ज्या मार्गाने निघणार त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. लाईट आणि जनरेटर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या बंदोबस्त करता बाहेरून एसआरपीएफ, होमगार्ड आणि पोलीस अधिकारी बोलवण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांसोबत बंदोबस्तात उपस्थित राहणार आहेत. शोभायात्रेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये त्याकरिता बोलणं झालं आहे.
विविध धर्माचे नागरिक या शोभायात्रा ठिकठिकाणी स्वागत करत असतात, ते देखील यावर्षी स्वागत करणार आहेत त्यांच्याशीही आमचं बोलणं झालं आहे.
शोभायात्रेदरम्यान ड्रोन कॅमेराचा वापर केला जाणार त्यातून आमचं लक्ष असणार टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे ड्रोन वापरण्यात येणार. असमाजिक तत्त्व जे गैरफायदा घेतात त्यांच्यावर देखील आमचं लक्ष राहील. जवळपास पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.