तब्बल २ वर्षा नंतर सोलापुरात जयंतीनिमित्त ५१ फुटी हनुमान मूर्तिचे झाले दर्शन
सोलापूरच्या तुळजापूर नाका मड्डी वस्ती परिसरात वडार समाज बांधवांनी १ कोटी ७५ लाख रुपये गोळा करून दोन वर्षांपूर्वी ५१ फुटी हनुमान मूर्ती उभी केली.
आज तब्बल २ वर्षानंतर हनुमान जयंतीच्या निमित्ताने ती भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. सोलापुरातील ही विशालकाय भव्यदिव्य मूर्ती सध्या हनुमान भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरत आहे.
आज सकाळपासून हनुमान भक्तांनी या मूर्तिचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं चित्र दिसून आल. या मूर्तीसाठी १७ विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र लागणार होते. त्यामुळे मागच्या २ वर्षांपासून ही मूर्ती पांढऱ्या कापाडाने झाकून ठेवण्यात आली होती.मात्र आता सर्व नाहरकत प्रमाणपत्र मिळालेले असून प्रशासकीय अडथळ्यांच्या मार्ग आता मोकळा झाला आहे.