महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे दरवर्षी एका अनोख्या आंबा महोत्सवाचा आयोजन करण्यात येतं. या महोत्सवामध्ये बच्चे कंपनीसाठी आंबा खाण्याची स्पर्धा भरवली जाते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा येथील भरवण्यात आलीये जो चिमुकला सगळ्यात जास्त आंबे खाईल त्याला या ठिकाणी बक्षीस देखील देण्यात येत.
बक्षीस म्हणून एक आंब्याची पेटी या चिमुकल्याला देण्यात येते पुण्यातील बालगंधर्व येथे ही स्पर्धा भरवण्यात आलीये. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव हा अनोखा उपक्रम मनसेकडून भरवण्यात येतोय या महोत्सवा अंतर्गत थेट कोकणातून आंबे ग्राहकांना मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची स्पर्धा देखील या ठिकाणी भरवण्यात येते.
यावेळी चिमुकल्याने देखील मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली