LOKSANDESH NEWS
आ.राजकुमार बडोले यांच्या हस्ते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप
गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.
सडक अर्जुनी येथे आज नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी सांगितले की, 23, 24 आणि 25 एप्रिल असे तीन दिवस हे साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असून, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली आहे आणि त्यांची नोंदणी वैध आहे, अशाच कामगारांना या शिबिरात किचन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, शासनाच्या योजना आणि सुविधा कामगारांपर्यंत पोहचवण्यासाठी आमदार बडोले सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले तर ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अश्या बांधकाम कामगारांना करिता या पुढे देखील नोंदणी शिबिराचे आयोजन करू अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली आहे.
भविष्यात देखील अश्याच पद्धतीच्या योजना शासनाच्या वतीने देण्यात यावा जेणे करून गौर गरीब जनतेला लाभ होईल आणी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी भावना बांधकामगारांनी व्यक्त केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली