LOKSANDESH NEWS
निकलक अकोलो येथे जनावरांच्या गोठ्याला लागली भीषण आग
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये अकोला या गावात अचानक भर दुपार १२:३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या गावाशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याला ही आग लागली असून, या आगीत गोठ्यात बांधलेले १५ ते २० शेतकऱ्यांची ३० ते ४० जनावरे जळाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, ही आग विझवण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, यादीत काही शेतकऱ्यांनी जीवाची भाजी लावत या मुक्या जनावरांना वाचवले आहे.
यावेळी काही शेतकऱ्यांनी फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क केला असता, तो संपर्क होऊ शकलेला नाही.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली