LOKSANDESH NEWS
पगार कमी झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, आठ तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा
सरकारने महामंडळाच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल 44% पगार कपात करून मिळाला. पगारी मधून फक्त 56% पगार या कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
मुला बाळांचे शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा काढायचा असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला. महिनाभर मेहनत करायची आणि पगारीच्या दिवशी नाराजी पदरी पडायची, यामुळे आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो. अशा भावना कर्मचाऱ्यांच्या आहेत. येणाऱ्या सात तारखेला वेळेवर पगार आणि पूर्ण पगार नाही झाला तर, आठ तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली