वडोदा तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट, घरातील साहित्य जळून खाक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वडोदा तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट, घरातील साहित्य जळून खाक

LOKSANDESH NEWS 



वडोदा तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट, घरातील साहित्य जळून खाक



 जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गॅसची गळती होऊन भडका झाला.

 


या याविषयी सविस्तर माहिती अशी की, शांताराम गोविंदा तांगडे हे आजुबाई संस्थान आनवा येथे दर्शनासाठी गेले असता सदरची घटना घडली आहे. यावेळी शेजाऱ्यांनी जाळ पाहून घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

 मात्र, गॅसने भडका घेतला होता व या भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील 2 लाख 60 हजार रुपये व 10 ते 15 क्विंटल डॉलर हरभरा गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण 4 लाख रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली