राजापूर तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊसाची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट चा इशारा दिला आहे यात पार्श्वभूमीवर पहाटे रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.
सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात इथला शेतकरी पडणार आहे.
किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावर लागले आहे. यामुळे कोकणातील मच्छीमारांच्या आर्थिक गणित कोलमडणार आहे. राजापूर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली