वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने
इंधन, गॅस दरवाढ व महागाई च्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार पुतळा येथे निदर्शने करुन शासनाच्या दरवाढीचा निषेध नोंदवलाय.'वाह रे अच्छे दिन, वाह रे महागाई' असं लिहलेला बोर्ड हातात घेऊन संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निदर्शने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिन येतील असे आश्वासित केले होते. मात्र वाढत्या महागाईमुळे जनतेला बुरे दिन आले आहेत. अदानी, अंबानी यांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ केलं जातं. आमदार खासदारांना 25% पगार वाढ केली जाते.
आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटलं जातंय. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड च्या वतीने निदर्शने करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली