LOKSANDESH NEWS
पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी घेतला क्रिकेटचा आनंद
महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे बागेश्वर बालाजी सनातन मठ मंदिर 14 एप्रिल रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर 5 ते 11 एप्रिल दरम्यान पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
8 आणि 13 एप्रिल रोजी दिव्य दरबार, 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार असून, 14 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास देशभरातील साधू-संत, भाविक तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीसाठी भारताचे पूर्व क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आले होते.
त्यांनी वीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी भिवंडीतील एका भव्य गोदामात क्रिकेट सामना खेळला. दोघांनी फलंदाजी आणि गोलंदाजी करत एकमेकांशी मैत्रीपूर्ण सामना खेळला आणि क्रिकेटचा भरपूर आनंद घेतला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली