LOKSANDESH NEWS
राज्य हिवताप अधिकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक दिवसीय लक्षवेध आक्रोश निर्दशने
राज्यातील हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने कर्मचारी आक्रोश हिवताप विभागाचे जिल्हा परिषद प्रशासनाकडे हस्तांतरण केल्यास उद्भवणाऱ्या अनेक अडचणी व समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक दिवसीय लक्षवेध निदर्शने आंदोलन करण्यात आले.
गेल्या सहा वर्षांपासून हिवताप योजनेतील सर्व कर्मचारी केवळ हिवताप कार्यक्रमापुरतेच मर्यादित कार्य करीत नसून साथरोग, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग व कुटुंब कल्याण कार्यक्रम आदी बहुउद्देशीय आरोग्य विषयक कार्य जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे करीत असून जनतेला आरोग्यसेवा पुरवित आहेत.
जिल्हा हिवताप अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींचे अधिकार जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याचे पत्र काढले. त्यास या योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट करण्याचा घाट शासनाने घातला आहे तसेच फेस रिडिंग बायोमेट्रिक हजेरीस कर्मचाऱ्यांचा विरोध आहे, अशी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांची आहे. राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आक्रोश निदर्शने करण्यात आले आहे.