LOKSANDESH NEWS
हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
श्री हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. चोपडा शहरातील विविध हनुमान मंदिरांवर भाविकांनी आज दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत,
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुरातन व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या बालविर हनुमान मंदिरात नागरिकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
आज शनिवार व हनुमान जयंती असल्याने हनुमानाचे आशीर्वाद घेण्यासाठी व दर्शनासाठी नागरिकांनी, युवकांनी, वयोवृद्धकांनी, महिलांनी गर्दी केलेली होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली