अर्जुना नदीतील मातीच्या भरावावरून आमदार किरण सामंत यांची आक्रमक भूमिका
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरधील अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम केलं गेलं. यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला गेला. पण, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील नदी पात्रात टाकलेला भराव काही काढला गेला नाही.
यावरूनच स्थानिक आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून हा भराव काढावा अशी विनंती केली आहे,
नदीवर पुलाचं काम करणारी ठेकेदार कंपनी जर हे काम करत नसेल, तर तुम्ही अन्य कोणत्याही मार्गाने हा भराव काढून टाका असं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी हे काम झालं नाही, तर पावसाळ्यात जो काही पूर येईल, किंवा अन्य ज्या काही समस्या निर्माण होतील त्याला पूर्णतः राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहिल, असा इशारा देखील आमदार किरण सामंत यांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली