खाते बँकेकडून स्थगित तरीही साडे तेरा लाखांचा चुना, महिलेची पोलिसांत तक्रार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खाते बँकेकडून स्थगित तरीही साडे तेरा लाखांचा चुना, महिलेची पोलिसांत तक्रार

                                                     LOKSANDESH  NEWS 


 

 खाते बँकेकडून स्थगित तरीही साडे तेरा लाखांचा चुना, महिलेची पोलिसांत तक्रार

मिरजेतील धक्कादायक प्रकार 

पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार, न्यायाची अपेक्षा 


 मिरजेतील मंगळवार पेठ परिसरात असणाऱ्या देशी दारू दुकानात भागीदारी करीत थेट परवाना धारकांनाच दमदाटी करीत वारसा हक्क सोडण्यासाठी धमक्या मिळत असून बँकेकडून तीन वर्षापूर्वी बंद केलेल्या खातेधारकाचा चेक वटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेने अर्जाद्वारे पोलिस अधिक्षक कार्यालयास दिली आहे.

देशी दारू दुकानाच्या परवानाधारक महिलेने भागीदारी व्यवसायात कामानिमित्त आपले चेक दिले होते. परंतु, संबंधित भागीदार असणाऱ्या व्यक्तीने अभद्र व्यवहार केल्याने तक्रारदार महिलेने भागीदारी व्यवसाय स्थगित केला. व यापुढे कोणताही व्यवहार सदरील खाते व चेकनुसार करणार नसल्याचे लेखी स्वरूपात बँक अधिकाऱ्यांना दिले. भागीदारी करणाऱ्यांनी दमदाटी करीत मला हिस्सा सोडण्यासाठी धमकी दिली असल्याचे महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. 

संबंधित भागीदारी करणाऱ्या व्यक्तीने आणि राज मार्केटिंग व ट्रेडर्सच्या व्यवस्थापकाने संगनमत करून तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा चेक वटवून रक्कम काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी लक्ष घालून फसवणूक केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली