भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी

                                                        LOKSANDESH  NEWS 






                                              भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी 



 विश्वाला अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे तिर्थनकार भगवान महावीर यांची जयंती भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


या निमित्ताने समस्त भिवंडी जैन महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने स्त्री, पुरुष, आबालवृद्ध, लहान बालके मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. सामाजिक सदभाव, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, शाकाहार याबाबत जनजागृती करणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक  येथून सुरू झालेली शोभायात्रा मंडई, गौरीपाडा, कणेरी, धामणकर नाका, येथून अंजूर फाटा या ठिकाणी शोभयात्रेचा समारोप करण्यात आला. 

या शोभायात्रेचे ठिकठिकाणी विविध मान्यवरां lकडून स्वागत करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली