बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणाऱ्या आरोपीला आटक
वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या इराद्याने मशिदीमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे फोन एका माथेफिरूने पोलिस नियंत्रण कक्षाला केला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. चौकशीअंती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
याप्रकरणी आरोपीवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तांत्रिक तपास करून पोलिसांनी दीपक शाहूबा ढोके (रा. एन 11, टीव्ही सेंटर हमू शुभम पॅलेस चैतन्य नगर धनकवडी, पुणे) या आरोपीला अटक केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली