LOKSANDESH NEWS
निराधार योजनेतील लाभार्थींना गाव पातळीवर हयातीचे दाखले जमा करता येणार तहसीलदार यांची माहिती
शासनाकडून विविध निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. यासाठी दरवर्षी तहसील कार्यालयात येऊन हयातीचे दाखले जमा करावे लागतात.
यासाठी ज्येष्ठ व इतर लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता गाव पातळीवर तलाठी कार्यालयात हयातीचे दाखले जमा करता येणार आहे. मात्र, दाखला जमा करताना नोंदवहीत सही व अंगठा अनिवार्य असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली