नवी मुंबई शहरात आयटी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जनजागृती म्हणून साय..फाय.. म्हणजेच सायबर फायनान्स या टीमची स्थापना करण्यात आली असून, या टीमच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड होऊ नयेत याकरिता कामं केले जाणार आहे.
या टीम मध्ये 500 पोलिसांना योग्य ट्रेनिंग देण्यात आले असून, यापुढे सायबर गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता ही टीम घेईल. आत्तापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 250 कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड झाल्याची नोंद आहे. ही बाब अत्यंत गंभीरतेने नवी मुंबई पोलिसांनी घेतली असून, यासाठी निधी व सहकार्य करण्यासाठी फेड एक्स व युनायटेड वे या आस्थापनानी तयारी दर्शवली आहे आणि फेड एक्सने आर्थिक सहकार्य केलं असून, युनायटेड वे यांच्यावतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नवी मुंबई शहर हे सायबर क्राईम मुक्त करण्यावर भर राहणार असल्याचे अमोल काळे यांनी सांगितले.