LOKSANDESH NEWS
सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशिअन डॉ.सतीश वळसंगकर यांची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या
00सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशिअन डॉ.सतीश वळसंगकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी लायसन्स रिवहोल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्वतःच्या बेडरूमच्या बाथरूममध्ये ही घटना घडल्याच निदर्शनास आलं.
त्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. त्यांनी लायसन्सड पिस्टल मधून गोळ्या झाडून घेतल्या आहेत.
यातील पहिली गोळी मिस फायर झाली, तर दुसरी गोळी डोक्यात लागली. याबाबत घटनास्थळावरून फॉरेन्सिक टिमने सर्व पुरावे गोळा केले असून, पोस्टमर्टम नंतर पुढील माहिती समोर येईल, अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली