LOKSANDESH NEWS
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
थाळीनाद करत कार्यकर्त्यांनी भीकमांगो आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको केल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली