खासदार विशाल पाटील यांनी घेतले श्री क्षेत्र बिरोबाचे दर्शन.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खासदार विशाल पाटील यांनी घेतले श्री क्षेत्र बिरोबाचे दर्शन.


LOKSANDESH NEWS 





खासदार विशाल पाटील यांनी घेतले श्री क्षेत्र बिरोबाचे दर्शन.


अरेवाडी ता कवठेमहांकाळ येथे श्री. क्षेत्र बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उस्तावात सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र  तसेंच भारतातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

आज यात्रे निमित्त खासदार विशाल पाटील यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेतले. तसेंच मंदिर परिसरातील अनेक मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. बिरोबा मंदिर परिसरात मधील आजूबाजूची पाहणी केली. उपस्थित सर्व यात्रेकरू यांची भेट घेऊन विचारपूस केली आणि यात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या.

बिरोबा देवस्थान कमेटी यांच्या वतीने खासदार विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थान कमेटी यांनी तीर्थक्षेत्र दर्जा आणि पुढील विकास कामे याबाबत खासदार यांना माहिती सांगितली.



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली