LOKSANDESH NEWS
रवी राणा यांचा वाढदिवस ‘जनसेवा दिवस’ म्हणून साजरा; विविध कार्यक्रमाचे आयोजन - आ. रवी राणा
आमदार रवी राणा यांनी आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जनसेवा दिवस’ म्हणून साजरा केला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी महसूल विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 8 अ चे पट्टे वाटप करण्यात आले. घरकुल योजना आणि पी आर कार्डचे वाटपही राबवण्यात आले.
जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हजारो लोकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. यासोबतच औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना रवी राणा म्हणाले, “अनेकांना मदत मिळाली पाहिजे, अनेकांचे प्राण वाचले पाहिजेत आणि जनतेला न्याय मिळावा, यासाठीच मी वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करतो असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली