LOKSANDESH NEWS
आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी
जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इन्स्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.
या धमकीनंतर खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं तसेच नोटीस देऊन त्याची सुटका देखील करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली