LOKSANDESH NEWS
हदगांव तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर
- नांदेड जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशाने नियंत्रण अधिकारी अविनाश कांबळे उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या नियंत्रणामध्ये आज तहसील कार्यालय हदगाव येथे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली असून,
सन २०२५ ते २०३० साठी आरक्षण सोडत २५ एप्रिल २०२५ रोजी तहसील कार्यालय हादगाव येथे आरक्षण सोडत पार पडले. यावेळी प्राधिकृत अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे तहसीलदार हदगाव, नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे. हदगाव या आरक्षण सोडतीला तालुक्यातील सरपंच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली