LOKSANDESH NEWS
मेहकर येथील अतिक्रमण हटाव मोहीम सुरु
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत दोनशेच्या वर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमण मधील प्रतिष्ठान नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले.
शहराचे सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे, आणि शहर सौंदर्यीकरण करायचे आहे अशी प्रतिक्रिया मेहकर चे नगर पालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली