अकोला महानगरपालिकेत आज उद्धव ठाकरे गटाच्यावतीने घागर मोर्चा
अकोल्यात ठाकरे गट आक्रमक झाला झाला असून चक्क अकोला महापालिकेच्या पाणी पुरवठा कार्यलयात तोडफोड केली असून खुर्च्याची आणि पाण्याच्या घागरीची तोडफोड केली आहे. तर अकोला शहरातल्या मलकापूर गौरक्षण रोड भागात मागील काही दिवसांपासून 10 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांसह ठाकरे घटना आज अकोला महापालिका कार्यालयात धडक दिली आहे.
तर या दरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्यासह महिलांनी सोबत आणलेले घागर अर्थातच पाण्याचे मटके पाणीपुरवठा अधिकारी अमोल डोईफोडे यांच्या कक्षात फोडले आहेत.
तर पाणी द्या पाणी द्या अशा घोषणा यादरम्यान देण्यात आल्या आहेत. तर पाणीपुरवठा अधिकारी कक्षात हजर नसल्याने चक्क ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर काही वस्तूंची तोडफोड केली आहे.
तर ठाकरे गट चांगलाच आक्रमक होताना अकोल्यात दिसून आला आहे. तर कार्यालयातील खुर्च्या आणि इतर काही वस्तूंची तोडफोड करताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते दिसून येत आहेत. तर पाण्याचा प्रश्न आता अकोल्यात चांगलाच पेटलेला असून. आंदोलन करताना महानगरपालिकेला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. जर चार दिवसात त्यांनी आमचं आश्वासन पूर्ण नाही केलं. तर आम्ही महानगरपालिकेतच रहायला येऊ असा इशाराही यावेळी आंदोलन करते उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली