LOKSANDESH NEWS
कोल्हापुरात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने मूक मोर्चा काढून आंदोलन
शक्तिपीठ विरोधी आक्रमक भूमिकेमुळे शासकीय सेवेतील गिरीष फोंडे या शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापूर महापालिकेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने केलेल्या या निलंबन कारवाई विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने मूक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
विविध शेतकरी संघटनेच्या आणि शिक्षक संघटनांनी या मुक मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. भवानी मंडप ते महानगरपालिका असा हा मूक मोर्चा काढला होता. खासदार राजू शेट्टी यांच्यासह इतरही अनेक नेत्यांसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली