ब्राम्हणवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. अजित महाराज दिघे यांचे सुश्राव्य कीर्तन!
ब्राम्हणवाडा:
प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने व ब्राम्हणवाडा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भव्य कीर्तन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे नामवंत कीर्तनकार ह.भ.प. अजित महाराज दिघे यांचे भावपूर्ण, सुश्राव्य आणि भक्तीरसात न्हालेलं कीर्तन.
महाराजांच्या कीर्तनात राम जन्माची कथा, त्याग, भक्ती आणि धर्मनिष्ठा यांचा सुरेल संगम रसिकांनी अनुभवला. उपस्थित भाविकांनी ‘रामनाम’गजरात हरिपाठ, भजन, कीर्तनाचा आस्वाद घेतला. संपूर्ण सप्ताहामध्ये गावातील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण ब्राम्हणवाडा भक्तिरसात न्हालं असून, प्रभू श्रीरामचरणी भक्तीचा महासागर अनुभवण्याची ही पर्वणी ठरत आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट तसेच यात्रा कमिटी ब्राम्हणवाडा यांच्याकडून भाविकांना सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून, शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली