LOKSANDESH NEWS
महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरीप हंगापासून बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजले असून येत्या खरीपा पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना दिले आहेत.
त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत सापडला आहे.
म्हणून एक रुपयात पीक विमा योजना बंद न करता पीकविमा योजनेची पुनर्रचना करतांना शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.