काकडी हत्याकांडातील आरोपीला अटक; पोलिसांच्या शोध मोहिमेला यश
काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासाचे आत गुन्ह्याची उकल करण्यात आलीये.
साहेबराव पोपट भोसले, रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपीतांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी 1) कृष्णा साहेबराव भोसले, वय 30 2) साहेबराव पोपट भोसले, वय 60 यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले,वय 55 सर्व रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला.
होताकाकडी, ता.राहाता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, .वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर,शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.
यानंतर आरोपींना शोधुन अटक करण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली