LOKSANDESH NEWS
जिल्हाभरात फळ उत्पादक शेतकरी करत आहेत तीव्र पाणीटंचाईचा सामना
मराठवाड्या मध्ये सध्या भीषण पाणी टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात भूजल पातळी कमी होत चालली आहे. दिवसांन-दिवस पिण्याचा पाण्यासह जनावरांना व शेतीसाठी लागणार पाणी यावरत बदनापूर तालुक्यामध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यातील काही तलाव कोरडेठाक झाले आहेत, तर काहींची पाणी पातळी कमी होत चालली आहे. बदनापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचे टँकर सुरू आहेत. टँकरद्वारे अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र शेतकरी पाण्या अभावी हवालदिल झाला आहे. आणि याचमुळे झोपडेश्वर येथील मोसंबी फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असल्याचे, या तरुण शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे :-
हे आहेत बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील सोपान दाभाडे ,सोपान दाभाडे या तरुण शेतकऱ्याकडे ५०० ते ६०० मोसंबीची झाड आहेत, या झाडांची त्यांनी मागील २ ते ३ वर्षापासून आपल्या पोटच्या मुलासारखी संगोपन केली व आता या झाडाला फळ लागली. मात्र पाण्याअभावी ही लागलेली फळ सुकून जात असल्याचे पाहायला मिळाले असून, याचे कारण म्हणजे त्यांच्या शेत शिवारात विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे या बगीचा सुखत आहेत. त्यामुळे या सर्व बगीच्यांचे शासनाने वेळीच पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य ते अनुदान द्यावे. जेणेकरून अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेती करेल. असे मत सोपान दाभाडे या शेतकऱ्यांने व्यक्त केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली


