जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेले गजानन उगले यांचे उपोषण लेखी अश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी उगले यांना लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
येणाऱ्या १० दिवसांत खरीप २०२४ चा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच अतिवृष्टी अनुदान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी उगले यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान सध्या गजानन उगले शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित असून, गेल्या ९ दिवसांच्या उपोषणामुळे उगले यांना सध्या थकवा जाणवत आहे. लेखी आश्वासन प्रशासनाने न पाळल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा ईशारा उगले यांनी प्रशासनाला दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली