LOKSANDESH NEWS
पवई मध्ये जय भीम पॅंथर चित्रपट विरोधात निदर्शने
पवईच्या जय भीम नगर परिसरातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या रहिवाशांनी पवईचा हिरानंदानी रोड जाम केला आहे. हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जय भीम पँथर हा चित्रपटाच्या विरोधात या नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे.
येथील नागरिकांचा आरोप आहे की, जय भीम पॅंथर या चित्रपटाचे निर्माते यांच्यावर जय भीम नगर दगडफेक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातून मिळालेल्या पैशांवर हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. या आंदोलनामुळे पवई हिरानंदानी रोड परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली