पुण्यातले दवाखाने हे कत्तलखाने झालेत का? असा प्रश्न पडायला लागला आहे - मेहबूब शेख
ON बीड पालकमंत्री
- कायदा सुव्यवस्थेचा भाग बीड जिल्ह्यामध्ये राहिला नाही.
- अंबाजोगाई तालुक्यातील दुर्दैवी घटना झाली.
- लाडकी बहीण म्हणायची आणि बहिणी सुरक्षित नाहीत.
- हाईट म्हणजे दुसऱ्या न्याय मिळवून देणाऱ्या महिला वकिलाला एवढी दुर्दैवी मारहाण होत असेल, तर कायदा सुव्यवस्थेचा भाग राहिलेला नाही.
- पालकमंत्री बदलले असले तरी पण यंत्रणातच आहे, त्यामुळे जोपर्यंत यंत्रणा बदलणार नाही तोपर्यंत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहणार नाही.
- पालकमंत्री हे महिन्यातून दोन-तीन वेळा येतात.
- बीडमध्ये अजून तरी परिवर्तन दिसत नाही.
- सरकार स्थापन झाल्यापासून ते दोन वेळा बीडमध्ये आले आहेत.
- ते बीडला येणार असतील तेव्हा रस्ते टॅंकरने धुऊन घेतले जातात, ज्या रस्त्याने जाणार तिथे कार्पेट टाकले जातात, ते गेल्यानंतर परिस्थिती जास्त येथे असते.
ON रणजित कासले
- निलंबित पोलीस अधिकारी स्वतः मेसेज दाखवत असेल, त्याच्या अकाउंटवर दहा लाख रुपये येत असतील तर याची चौकशी व्हायला हवी.
- अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असेल, तर उच्चस्तरीय एस.आय.टी. नेमून चौकशी व्हायलाच हवी.
- पंकज कुमावत सारखा एखाद्या अधिकाऱ्याला म्हणून चौकशी करायला हवी.
- मरकडवाडी सारख्या गावातील सामान्य माणसाच्या मनात देखील EVM ची शंका आहे.
ON लडकी बहीण
- बहिणी लाडक्या कधीच नव्हत्या फक्त निवडणुकीपुरत्या त्या लाडक्या होत्या
- एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयाची घोषणा केली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्या सावत्र बहिणी वाटायला लागल्या होत्या. अशी एक शंका या सरकारच्या कुरघोडी पाहता येते.
- एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीचे श्रेय जाऊ नये, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख बहिणी कमी केल्या.
- नमो योजनेच्या महिला भगिनी लाभ घेतात, त्यातल्या दहा लाख महिला कमी केल्या.
- एकनाथ शिंदें च्या बहिणींना देवेंद्र फडणवीस सावत्र भावासारखे वागवत आहेत.
ON भिसे कुटुंब
- भिसे कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर पहिल्याच दिवशी दिला असता
- आमदारांचे ते पी.ए होते ते आमदारांचे पहिले भाषण पाहिले, तर ते काय बोलत होते नंतर त्यांनी का पलटी मारली त्यांच्यावर कोणाचा दबाव होता. हे सरकार मंगेशकर हॉस्पिटलला वाचवण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करते हे लक्षात येते.
- डॉक्टरांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम करावं
- पुण्यातले दवाखाने हे कत्तलखाने झालेत का? असा प्रश्न पडायला लागला आहे.
- पेशंट गेला तर तुम्ही त्याला कापणार दहा-वीस लाख रुपये पेशंटच्या खिशात नसले, तर तुम्ही त्याला घेणार नाही. हे कसलं चॅरिटेबल ट्रस्ट
- ज्या कुटुंबाने हॉस्पिटल साठी जमीन दिली त्या कुटुंबाला कडून सुद्धा हे विजिटिंग फी घेतात