डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा कहर! एमआयडीसीनंतर २७ गावातही काळे ठिपके
डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभागानंतर आता केडीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या २७ गावात सुद्धा गाड्यांवर काळे ठिपके पडण्याच्या घटनेने खळबळ उडवली आहे.
वाहनांपासून ते नागरिकांच्या कपड्यांवर आणि पत्र्याच्या शेडवर पडणारे हे काळसर ठिपके नागरिकांच्या आरोग्यावरील संभाव्य धोका अधोरेखित करत आहेत. या पूर्वी हिरव्या पावसामुळे आणि गुलाबी रस्त्यामुळे चर्चेत आलेले डोंबिवली आता या विचित्र आणि अज्ञात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी आधीच याविरोधात आवाज उठवला होता.
आता हा प्रकार २७ गावांमध्ये दिसू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या वाहनांवर, राहणीमानावर आणि आरोग्यावर होत आहे. महागड्या गाड्यांवर पडलेले हे ठिपके सर्व्हिस सेंटरमध्ये नेल्यानंतरही निघत नाहीत, अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपास सुरू असल्याचे सांगत, लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, प्रदूषणाची ही नवी लाट नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली